By  
on  

मी आणि नव्यानवेली केवळ मित्र आहोत : मिजान जाफरी

 बॉलिवूडमध्ये सुरुवात करण्यापूर्वीच मिजान जाफरीच्या लिंक अप्सच्या बातम्या येत आहेत. मिजानचं नाव जोडलं जात आहे, बिग बींची नात नव्या नवेली नंदा हिच्यासोबत. ‘मलाल’च्या प्रमोशनवेळी मिजानने या नात्याबद्दल खुलासा केला. तो म्हणतो’ ‘माझ्यात आणि नव्यामध्ये केवळ मैत्री आहे. आम्ही खुप चांगले मित्र आहोत. मित्रांसोबत थिएटरमधून बाहेर पडल्यानंतर जरूरी नाही त्यांच्यात काही वेगळं नातं असेल. त्यांच्यात मैत्रीही असू शकते.

यावेळी मिजानसोबत काही खेळ खेळले गेले. यामध्ये त्याला तीन नावं निवडायची होती त्यात एकीला मारायचं होतं, एकीशी लग्न करायचं होतं आणि एकीशी केवळ नात्यात रहायचं होतं. यावेळी त्याने अनन्याला मारायचं ठरवलं, नव्याशी लग्न करायचं ठरवलं तर सारासोबत नात्यात रहायला आवडेल हे सांगितलं. मिजान आणि शर्मिन दोघंही प्रमोशनसाठी झुमच्या ‘इंन्व्हाईट ओनली’ या शोमध्ये आले होते.

Recommended

PeepingMoon Exclusive