
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे जोडपं या ना त्या कारणाने कायम चर्चेत असतं. प्रियांका आणि निक अलीकडेच इटलीमधील टस्कनी येथे सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसून आले. यावेळचे काही बोल्ड फोटो प्रियांकाने चाहत्यांशी शेअर केले आहेत.
Best use of a vacation. The hubby taking pictures. Lol @nickjonas ️
A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on
स्विमसुट मध्ये असलेल्या प्रियांकाचे बोल्ड फोटो चाहत्यांना पसंत पडत आहेत. स्विम सुटमधील पुलशेजारी ड्रिंक घेणारी प्रियांका या फोटोत कमालीची आकर्षक दिसत आहेत. या फोटोला प्रियांकाने कॅप्शनही तितकंच मजेदार दिलं आहे. ती म्हणते, 'Best use of a vacation. The hubby taking pictures. Lol'.
या जोडीने अलीकडेच जोए जोनास आणि सोफी टर्नर यांच्या लग्नाला हजेरी लावली होती. त्यावेळी प्रत्येकाची नजर प्रियांका आणि निकवरच खिळली होती. प्रियांका निकच्या कॉन्सर्टनाही आवर्जुन हजेरी लावत असते. प्रियांका लवकरच ‘द स्काय इज पिंक’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत फरहान अख्तरही असणार आहे.