'बाटला हाऊस' नंतर या 'अटॅक'साठी होणार जॉन अब्राहमला सजा

By  
on  

जॉन अब्राहम हा ऍक्शन सिनेमांचा हुकुमी एक्का आहे. जॉन लवकरच 'बाटला हाऊस' या आगामी थ्रिलरपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'बाटला हाऊस' नंतर जॉनने पुढच्या सिनेमाची घोषणा केली आहे. लक्ष्य राज आनंद दिग्दर्शित 'अटॅक' या ऍक्शनपटातून जॉन अब्राहम झळकणार आहे. 'अटॅक' हा लक्ष्य राज आनंद यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा असणार आहे. 

या सिनेमाची निर्मिती जॉन स्वतः करत आहे. जॉनसह अजून दोन निर्माते सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळत आहेत. जॉन या सिनेमाबाबत म्हणाला,''आम्हाला सिनेमाच्या कथानकावर जास्त विश्वास आहे. सिनेमा पाहताना प्रेक्षकांचं मनोरंजन सुद्धा होईल आणि त्यांना चांगला सिनेमा पाहण्याचं समाधान सुद्धा मिळेल हा आमचा उद्देश असतो.''

या सिनेमाशी संबंधित निर्मात्यांनी खुलासा केला की,''अटॅक हा असा सिनेमा आहे जो युवा पिढीने आवर्जून बघावा. जॉन अब्राहमच्या निर्मिती संस्थेसोबत काम करणं ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.''

येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून जॉन अब्राहमचा 'बाटला हाऊस' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

Recommended

Loading...
Share