भारताच्या क्रिकेट पराभवानंतर विवेक ओबेरॉयने केली ही गोष्ट, नेटकऱ्यांनी केले ट्रोल

By  
on  

भारताला क्रिकेट विश्वचषकात सेमी फायनलमध्ये न्यूझीलंड कडून पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंसह समस्त भारतीयांची मनं उदास झाली. परंतु अभिनेता विवेक ओबेरॉयने भारताच्या या पराभवावर एक GIF त्याच्या ट्विटरवरून शेयर केला असून यामुळे विवेक ओबेरॉयला पुन्हा एकदा नेटकऱ्यांकडून ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. 

विवेक ओबेरॉयने शेअर केलेल्या GIF मध्ये एका व्यक्तीला रस्त्याने जात असताना एक महिला त्याच्याकडे येऊन त्याला मिठी मारण्याच्या तयारीत आहे असे वाटते. मात्र प्रत्यक्षात ती महिला त्या व्यक्तीच्या मागे उभ्या असलेल्या माणसाकडे जाते आणि त्याला मिठी मारते. विवेक ओबेरॉयने हे GIF शेअर केलं असून त्याखाली न्यूझीलंडविरोधातल्या सामन्यात भारतीय चाहत्यांची अवस्था नेमकी अशीच झाली, असे म्हटले आहे. 

 

 

विवेकच्या या GIF वर समाजमाध्यमात टीकेची झोड उठली. एका यूजरने यावर म्हटलं आहे,''विवेक आता तरी सुधार, नाहीतर कायम लोकं तुला गृहीतच धरणार''

अजून एक यूजर म्हणाला,''भारतीय टीम शेवटपर्यंत सन्मानपूर्वक लढली आणि बाहेर गेली. तुझ्यासारखं नाही जो माणूस कायम फ्लॉप सिनेमे करत आहे.''  ''ऐश्वर्यानेही तुझ्यासोबत हेच केले'' असं म्हणत एका युजरने ऐश्वर्या खळाळून हसत आहे असं GIF शेयर केलं. 

याआधीही विवेक ओबेरॉयने एक्झिट पोल्सबाबत एक ट्विट केले होते. त्यात त्याने सलमान खान, ऐश्वर्या राय यांचाही फोटो वापरला होता. यावरून त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. त्या प्रकरणाचं वादळ शांत होतं तोच विवेकने हा नवा वाद स्वतःवर ओढवून घेतला आहे. विवेकच्या फिल्मी करियरचा आलेख उंचावत नसला तरी सध्या वादग्रस्त प्रकरणं ओढवून घेण्यात सध्या विवेक अव्वल आहे. 

Recommended

Loading...
Share