By  
on  

नवाजुद्दीन सिद्दीकी बनला गायक, देसी स्टाईलने गाणार रॅप

बॉलिवूड स्वत:च्या नावाचा ठसा उमटवणा-या अभिनेत्यांमध्ये नवाजुद्दीनचं नाव सर्वात वर आहे. नवाजुद्दीनने आजवर अनेक व्यक्तिरेखा उत्तमपणे साकारल्या आहेत. आजवर नवाजुद्दीन आपल्यासमोर अभिनेत्याच्या रुपात समोर आला आहे. पण त्याने आता एक नवी इनिंग सुरु केली आहे. नवाजुद्दीन आता गायक बनणार आहे. त्याच्या ‘बोले चूड़ियां’ या सिनेमात तो रॅप साँग गाणार आहे. ‘स्वॅगी चुडिया’ असं या गाण्याचं शीर्षक असेल.

कुमार या गाण्याचं लेखन करणार आहेत तर संगीत असेल इंदर आणि सनी बावरा यांचं. नवाजुद्दीनचा भाऊ शम्स या सिनेमाचा दिग्दर्शक असणार आहे. या सिनेमात एका बांगडीवाल्याची कथा आहे. जो काही काळाने त्याचं बांगड्यांची फॅक्टरी सुरु करतो आणि या गाण्याचा उपयोग तो मार्केटिंगसाठी करतो. या गाण्याबद्दल बोलताना शम्स म्हणतो की, नवाजशी बोलल्यावर सुरुवातीला तो गाण्यासाठी फारसा उत्सुक नव्हता. पण त्याने होकार दिला. आता तो या गाण्यासाठी खुप उत्साहित दिसून येत आहे. या सिनेमात नवाजुद्दीनसोबत तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत दिसेल.

Recommended

PeepingMoon Exclusive