पाहा Teaser: हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ मध्ये आता होणार 'वॉर'

By  
on  

अभिनेता हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ हे एकत्र एकाच सिनेमात झळकण्याचा दुग्धशर्करा योग्य जुळून येतोय आगामी 'वॉर' सिनेमाच्या निमित्ताने. हे दोघं एकत्र एकाच सिनेमात झळकणार असल्याची जोरदार चर्चा होती. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. 'यशराज फिल्म्स'ने 'वॉर' या सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. या सिनेमात हृतिक आणि टायगर  ऍक्शन अंदाजात पाहायला मिळत आहेत. 

हृतिक आणि टायगर यांच्यासह 'वॉर'मध्ये अभिनेत्री वाणी कपूर झळकणार आहे. या टीजरमध्ये वाणी कपूर एकदम हॉट अंदाजात झळकत आहे. हृतिक आणि टायगर हे या टीजरमध्ये ऍक्शनपॅक भूमिकेत पाहायला मिळत असून या दोन अभिनेत्यांना एकत्र स्क्रीनवर पाहणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे. 

 

सिद्धार्थ आनंद हे या 'वॉर'चं दिग्दर्शन करत असून हा ऍक्शनपॅक सिनेमा 2 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

Recommended

Loading...
Share