पाहा व्हिडिओ, अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीचा गायनाचा अनोखा अंदाज

By  
on  

बॉलिवूड स्वत:च्या अभिनयाचा ठसा उमटवणा-या अभिनेत्यांमध्ये नवाजुद्दीनचं नाव सर्वात वर आहे. शून्यापासून सुरुवात करत आज नवाझुद्दीन अनेक महत्वपूर्ण सिनेमांमध्ये झळकत आहे. नवाजुद्दीनने आजवर अनेक व्यक्तिरेखा उत्तमपणे साकारल्या आहेत. नवाझुद्दीनने साकारलेल्या या सर्व व्यक्तिरेखांवर प्रेक्षकांनी प्रेम केले. 

अभिनयासोबत नवाझने आता एक नवी इनिंग सुरु केली आहे. नवाजुद्दीन आता गायक बनणार आहे. त्याच्या आगामी ‘बोले चूड़ियां’ या सिनेमात तो रॅप साँग गाणार आहे. ‘स्वॅगी चुडिया’ असं या गाण्याचं शीर्षक असेल. कुमार या गाण्याचं लेखन करणार आहेत तर संगीत असेल इंदर आणि सनी बावरा यांचं. नवाजुद्दीनचा भाऊ शम्स या सिनेमाचा दिग्दर्शक असणार आहे. नवाझुद्दीन या व्हिडीओमध्ये एकदम स्वैग अंदाजात रॅप करत असलेला पाहायला मिळतो. 

 

या सिनेमात एका बांगडीवाल्याची कथा आहे. जो काही काळाने त्याच्या बांगड्यांची फॅक्टरी सुरु करतो आणि या गाण्याचा उपयोग तो मार्केटिंगसाठी करतो. या गाण्याबद्दल बोलताना शम्स म्हणतो की, ''नवाजशी बोलल्यावर सुरुवातीला तो गाण्यासाठी फारसा उत्सुक नव्हता. पण त्याने होकार दिला. आता तो या गाण्यासाठी खुप उत्साहित दिसून येत आहे.'' या सिनेमात नवाजुद्दीनसोबत तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत दिसेल.

Recommended

Loading...
Share