अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ आणि जॉनचा ‘बाटला हाऊस’ च्या बॉक्स ऑफिस क्लॅशवर अक्षय काय म्हणतो पाहा

By  
on  

अक्षय कुमारच्या मिशन मंगलचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. हा सिनेमा 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे. या सिनेमासोबतच जॉन अब्राहमचा ‘बाटला हाऊस’ हा सिनेमाही रिलीज होत आहे. या मोठ्या क्लॅशसंबंधी अक्षयला प्रश्न विचारला असता तो म्हणतो, ‘वर्षात किती शुक्रवार असतात? 52. आणि एका वर्षात किती सिनेमे रिलीज होतात 180-190. अशा वेळी दोन सिनेमे एकत्र रिलीज होणं सहाजिक आहे. याशिवाय हॉलिवूड सिनेमेही रिलीज होत असतात. यात वेगळं असं काही नाहीये.

 

यासाठी आम्ही एकमेकांना दोष देणं योग्य नाही.’ जगन शक्ती दिग्दर्शित मिशन मंगल मध्ये विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू आणि शरमन जोशी, परेश रावल, किर्ती कुल्हारी यांच्या मुख्य भूमिका आहेत. भारताची पहिली मंगळयान मोहिम या सिनेमातून दाखवली जाणार आहे.

Recommended

Loading...
Share