‘दबंग 3’ मधून फारकत घेतल्यानंतर मलायका अरोराला काय वाटतं, जाणून घ्या

By  
on  

सलमान खानच्या ‘दबंग’ फ्रॅंचाईजीचं आणि मुन्नीचं अनोखं नातं आहे. या सिनेमाच्या यशात या गाण्याचाही तितकाच वाटा आहे. आता सलमानचा दबंग 3 येऊ घातला आहे. पण मलायका या सिनेमाचा हिस्सा नाहीये. यावर मलायाकाला विचारलं असता ती म्हणते, ‘मी या सिनेमाचा हिस्सा नाहीये. जे कोणी या सिनेमाशी जोडलेले आहेत ते पुढे निघून गेले आहेत. मी त्या सगळ्यांना शुभेच्छा देऊ इच्छिते.’

मलायकाने दबंगमध्ये आयटम साँग सादर केलं होतंच पण ती या सिनेमाची निर्मातीदेखील होती. पण खान कुटुंबाचा हिस्सा नसल्याने ती आता फ्रॅंचाईजीचा देखील भाग नाहीये. मलायका सध्या अर्जुन कपूरसोबत असलेल्या अफेअरमुळे जास्त चर्चेत असते. पण स्वत:च्या प्रॉड्क्शन हाऊसकडून काही प्रोजेक्टवर काम करणार असल्याचंही तिने बोलून दाखवलं आहे.

Recommended

Loading...
Share