By  
on  

हृतिक रोशनच्या ‘सुपर 30’ ची दमदार कामगिरी, बिहारनंतर राजस्थानमध्येही टॅक्स फ्री

हृतिक रोशनच्या पदरात ब-याच दिवसांनी ‘सुपर 30’च्या रुपाने यश मिळालं आहे. गणिततज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या सिनेमाने आतापर्यंत चांगली कमाई केली आहेच याशिवाय प्रेक्षकांच्या पसंतीस ही उतरला आहे. बिहारी पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या या सिनेमाला बिहार सरकारने टॅक्स फ्री जाहीर केलं आहे.

त्यापाठोपाठ राजस्थानमधील अशोक गहलोत सरकारनेही या सिनेमला टॅक्स फ्री म्हणून जाहीर केलं आहे. याची माहिती मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी स्वत: ट्वीट करत दिली आहे. या ट्वीटमध्ये मुख्यमंत्री म्हणतात, ‘आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित असलेल्या सिनेमात इच्छाशक्ती आणि निश्चय यांचा मिलाफ दिसून येतो. या सिनेमातून हाच संदेश मिळतो की अनेक अडचणी असल्या तरी प्रयत्न केल्यास यश मिळू शकतं. मी राजस्थानमध्ये हा सिनेमा टॅक्स फ्री घोषित करतो. हा सिनेमा हृतिकच्या यशात मैलाचा दगड बनेल यात शंका नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive