Exclusive: आपल्या तिस-या सिनेमासाठी वरुण धवन आणि शशांक खेतान शोधत आहेत लीड अ‍ॅक्ट्रेस

By  
on  

अभिनेता वरुण धवन आणि शशांक खेतान ही जोडी आपल्या तिस-या सिनेमासाठी मुख्य अभिनेत्रीच्य शोधात आहेत. पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार, हा सिनेमा एक लव्हस्टोरी आहे. पुढील सहा महिन्यात या सिनेमाचं शुटिंग सुरु होईल.

  हे दोघं एकत्र सिनेमा करत असल्याने वाचकांना त्यांच्या रणभूमी सिनेमाबाबत गोंधळ होण्याची शक्यता आहे. पण हे खरं नाही. रणभूमी हा सिनेमा धर्मा प्रॉडक्शनसाठी शशांक दिग्दर्शित करत आहे. या सिनेमातही दोन अभिनेत्री असण्याची शक्यता आहे. त्यापैकी एक म्हणजे आलिया आणि दुसरी जान्हवी कपूर. पण शशांक वरुण आणि आलिया या लकी जोडीला एकत्र घेऊन एका थ्रिलर सिनेमाच्या निर्मितीच्या विचारात असल्याची चर्चा देखील होती. पण काही कारणास्तव ही चर्चा पूर्णत्वास जाऊ शकली नाही. पण आता वरुण आणि शशांक तिस-या सिनेमासाठी तयार आहेत. गरज आहे ती फक्त एका अभिनेत्रीची.

Recommended

Loading...
Share