‘कबीर सिंग’च्या यशाचा धमाका सुरुच, बनला वर्षातील सगळ्यात मोठा ब्लॉकबस्टर

By  
on  

‘कबीर सिंग’ला मिळालेलं यश पाहता हा शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी यांच्या करीअरमधील पहिला ब्लॉकबस्टर सिनेमा आहे असं म्हटलं तर चुकिचं होणार नाही. हा सिनेमा या दोघांच्या करीअरमधीलच नाही तर या वर्षातील ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला आहे. तेलुगु सिनेमा ‘अर्जुन रेड्डी’चा रिमेक असलेला या सिनेमाने कमाईत उरी या सिनेमाला कधीच मागे टाकलं आहे. याशिवाय 250 कोटींचा जादुई आकडादेखील कधीच पार केला आहे. 

 

या वर्षातील सर्वात यशस्वी सिनेमाचा मानदेखील कबीर सिंगला मिळाला आहे. या सिनेमाने आतापर्यंत जगभरात 350 कोटींच्या कमाईचा आकडा पार केला आहे. येत्या आठवड्यात मात्र कबीर सिंगची काहीशी पीछेहाट होण्याची शक्यता आहे. कारण येत्या शुक्रवारी कंगना राणावत आणि राजकुमार रावचा ‘जजमेंटल है क्या?’ रिलीज होत आहे. याशिवाय ‘’द लायन किंग’ ही कबीर सिंगवर भारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Recommended

Loading...
Share