पाहा व्हिडिओ: सलमान खानने दिला या जुन्या आठवणीला उजाळा

By  
on  

काळ बदलला तसं लोकांच्या संवादाच्या पद्धती बदलल्या. आधी फॅन्स आपल्या आवडत्या सेलिब्रिटींना पत्र पाठवायचे आणि आपल्या भावना व्यक्त करायचे. सेलिब्रिटी सुद्धा फॅन्सने पाठवलेल्या पत्रांची उत्तरं द्यायचे. बदलत्या काळानुसार संवादाचे हे जुने माध्यम काळाच्या पडद्याआड गेले. बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानने एक व्हिडिओ पोस्ट करून याच जुन्या माध्यमाची सर्वांना आठवण करून दिली. 

यात सलमानच्या हातात एक पत्र आहे. सलमान तोंडाने ते पत्र बंद करतो. आणि आधी जसं पत्र पेटीमध्ये टाकायचो तशी ऍक्शन हा दबंग खान करतो. 'जुन्या काळाप्रमाणे पोस्ट करत आहे. मिळालं का?' असं कॅप्शन सलमानने या व्हिडिओखाली लिहिलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Posting the old fashioned way...

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

सर्वांचा लाडका भाईजान सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असतो. व्हिडिओ, फोटोंद्वारे तो चाहत्यांच्या कायम संपर्कात असतो. सलमान सध्या 'दबंग 3' आणि 'इन्शाल्लाह' या दोन सिनेमांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 

Recommended

Loading...
Share