By  
on  

पाहा व्हिडिओ: 'सेक्रेड गेम्स 2' मधील व्यक्तिरेखांचा झाला पर्दाफाश

नेटफ्लिक्स वरील बहुचर्चित 'सेक्रेड गेम्स 2' ची सर्व प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. पहिल्या सीजनला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर दुसऱ्या सिजनमध्ये प्रेक्षकांना नवीन काय पाहायला मिळणार याची सर्वत्र चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी 'सेक्रेड गेम्स 2' चा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलरपासूनच या सिरिजविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता ताणली गेली आहे. तसेच नुकतंच नेटफ्लिक्सने या सीरिजमधील व्यक्तिरेखा उलगडणारा एक रंजक व्हिडिओ प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. 

या व्हिडिओमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी, रणवीर शौरी, पंकज त्रिपाठी, सैफ अली खान आणि कल्कि केंकला सह प्रत्येक कलाकाराचा व्हिडिओ आला आहे. या व्हिडिओत सर्व स्टायलिश अंदाजात रेट्रो लूकमध्ये दिसत असून आपल्या व्यक्तिरेखेविषयी सांगत आहेत. 

 

'सेक्रेड गेम्स 2' ही बहुचर्चित वेबसिरीज 15 ऑगस्ट 2019 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गणेश गायतोंडे आणि सरताज सिंग यांच्यामधलं द्वंद्व पाहायला सर्वजण उत्सुक आहेत. 

Recommended

PeepingMoon Exclusive