By  
on  

इब्राहिमबाबत सैफ म्हणतो, ‘बाप से बेटा सवाई’ का ते जाणून घ्या

सैफ अली खान आणि त्याच्या कुटुंबाबद्दल जाणून घेण्याची चाहत्यांना कायमच उत्सुकता असते. सैफ आणि अमृताची दोन्ही मुलंही सतत लाईमलाईट मध्ये असतात. सारा अली खान तर माध्यमांची हॉट फेव्हरिट आहे. पण इब्राहिम अली खानदेखील प्रसिद्धीमध्ये अजिबात मागे नाही.

अलीकडेच सैफने इब्राहिमच्या बॉलिवूड डेब्युबद्दल माध्यमांसमोर भाष्य केलं.  सैफ म्हणतो, इब्राहिम बॉलिवूडमध्ये येईल यात कोणतीही शंका नाही. तो चांगला दिसतोच. माझ्यामते तो माझ्यापेक्षाही चांगला दिसतो. माझ्या सगळ्या मुलांना अभिनयात विशेष आवड आहे असं मला नेहमी वाटतं. आमच्या कुटुंबात सगळेच अभिनय क्षेत्राशी निगडीत आहेत. पण इब्राहिम अजून यासाठी लहान आहे. त्याने आधी शिक्षण पूर्ण करावं. त्यानंतर तो जे काही करेल त्याला आमचा पाठिंबा आहे. आता सारानंतर इब्राहिमला बॉलिवूड आणि प्रेक्षक कसं स्विकारतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Recommended

PeepingMoon Exclusive