By  
on  

''माझ्या करियरमध्ये ट्विंकलचं मोठं योगदान'', अक्षय कुमारने पत्नीविषयी काढले कौतुकोद्गार

अक्षय कुमार सध्या आपल्या करियरच्या परमोच्च शिखरावर आहे. अक्षय कुमार सध्या जे सिनेमे करतोय ते बॉक्स ऑफिसवर सुपरहिट होत आहेत. अक्षयने याचं श्रेय आपली पत्नी ट्विंकल खन्नाला दिलं.

अक्षय आणि ट्विंकल हे बॉलीवूडमधलं कायम चर्चेत असणारं जोडपं. असं म्हणतात,'एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा मोठा वाटा असतो'. अक्षय नेहमी अनेक कार्यक्रमांमध्ये ट्विंकलची तारीफ करत असतो. एका आघाडीच्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमार ट्विंकलविषयी म्हणाला,''ट्विंकलचं माझ्या करियरमध्ये मोलाचं योगदान आहे. प्रत्येकवेळी सिनेमा करताना मी तिच्याशी बोलेलच असं नाही. परंतु तिने सांगितलेल्या गोष्टी मी लक्षात ठेवतो. जे तुला चांगलं वाटेल ते तू कर, हे तिचं नेहमी म्हणणं असतं.''

अक्षय सध्या ट्विंकल आणि आपल्या मुलांसोबत लंडनला सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. 'मिशन मंगल'च्या ट्रेलर लाँचसाठी अक्षय लंडनमधून परतला होता. अक्षयचा आगामी 'मिशन मंगल'हा सिनेमा १५ ऑगस्ट २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात अक्षयसोबत विद्या बालन, शरमन जोशी, कीर्ति कुल्हारी, तापसी पन्नू आदी कळकरच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive