By  
on  

अभिनेत्री विद्या बालन करतेय निर्मितीक्षेत्रात पदार्पण, निवडलंय हे माध्यम

विद्या बालन ही बॉलीवूडमधली एक हरहुन्नरी अभिनेत्री. आजवर तिने अनेक सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारून प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. अभिनयासोबत आता विद्या निर्मितीक्षेत्रात सुद्धा पदार्पण करत आहे. परंतु विद्या बालन कोणत्याही सिनेमाची निर्मिती करत नसून ती एका शॉर्टफिल्मच्या निर्मितीची धुरा सांभाळत आहे. 

'नटखट' असं या शॉर्टफिल्मचं नाव असून भारतात बलात्कारासारख्या ज्या अघोरी घटना घडतात, त्यावर ही शॉर्टफिल्म आधारित आहे. अनुकंपा हर्ष आणि शान व्यास यांनी ही शॉर्टफिल्म लिहिली आहे. शान व्यास यांनी 'मसान' आणि 'शाहिद' यांसारख्या सिनेमांच्या लेखनामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. विद्या बालन निर्माते रॉनी स्क्रूवाला यांच्यासह या शॉर्टफिल्मची निर्मिती करत आहे. तसेच या शॉर्टफिल्ममध्ये विद्या एका छोट्याश्या भूमिकेत झळकणार आहे. 

 

विद्या या शॉर्टफिल्मविषयी म्हणाली,''या शॉर्टफिल्मचं कथानक प्रभावी आहे. यामधून असा एक विषय प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे ज्या विषयाचा त्यांनी यापूर्वी अनुभव घेतला नाही.''

या शॉर्टफिल्म सोबतच विद्या 'मिशन मंगल' या आगामी सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेत झळकत आहे. या सिनेमात विद्यासह अक्षय कुमार, तापसी पन्नू, शर्मन जोशी आदी कलाकार सुद्धा झळकणार आहेत. हा सिनेमा १५ ऑगस्ट २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive