By  
on  

सलमान नाही तर हा अभिनेता बनणार होता ‘दबंग’चा चुलबुल पांडे

सलमानच्या सिनेमांची त्याचे फॅन्स कायम वाट पहात असतात. अलीकडेच त्याच्या ‘भारत’ सिनेमाने रसिकांच्या पसंतीची पावती मिळवली होती. आता सलमानचा आणखी एक सिनेमा येऊ घातलाय तो म्हणजे ‘दबंग 3’.
‘दबंग’ फ्रॅंचाईजीने सलमानला यशोशिखरावर नेऊन बसवलं. अरबाजने नुकतंच या सिनेमाविषयीच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Chulbul is back..... #Dabangg3 @aslisona @arbaazkhanofficial @nikhildwivedi25 @prabhudheva @skfilmsofficial

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

 

तो म्हणतो, ‘या फ्रॅंचाईजीची सुरुवात 2010मध्ये झाली होती. त्यावेळी या सिनेमासाठी दिग्दर्शक अभिनव सिन्हा याची पहिली चॉईस रणदीप हुडा किंवा इरफान खान हे कलाकार होते. पण त्यांच्यासोबत या सिनेमाचं बोलणं न झाल्याने सलमानची एंट्री या सिनेमामध्ये झाली.’ अभिनवने ज्यावेळी या सिनेमाची पटकथा ऐकवली होती. त्यावेळी अभिनवकडे अरबाजने चुलबुलचा रोल करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण त्याला चुलबुलच्या भावाचा रोल दिला गेला. ‘दबंग 3’चं शुटिंग सप्टेंबरपर्यंत संपणार असल्याचं यावेळी अरबाजने सांगितलं. 'दबंग 3' येत्या २० डिसेंबर २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive