By  
on  

करण म्हणतो, ‘डिअर कॉम्रेड’मध्ये जान्हवी-इशान नाहीत

सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरने त्याच्या आगामी सिनेमाविषयी अलीकडेच घोषणा केली. करण तेलुगु सिनेमा ‘डिअर कॉम्रेड’ चा हिंदी रिमेक बनवणार आहे. या रिमेकमध्ये करणची लाडकी जोडी इशान आणि जान्हवी दिसणार का अशी चर्चा होती. पण करणने या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. एका ट्वीटमधून करणने हे स्पष्ट केलं आहे. आज तेलुगु भाषेतील ‘डिअर कॉम्रेड’ सिनेमा रिलीज झाला आहे.

 

या सिनेमाला शुभेच्छा देताना करण म्हणतो, ‘डिअर कॉम्रेड’च्या टीमला खुप खुप शुभेच्छा. यासोबतच हे सांगू इच्छितो की हिंदी रिमेकसाठी अजूनही कुणाल फायनल केलेलं नाहीये किंवा कोणत्याही कलाकाराला अ‍ॅप्रोच केलेलं नाहीये.’ करण या सिनेमात जान्हवी आणि इशान खट्टरला घेणार असल्याची चर्चा होती. पण करणच्या स्पष्टोक्तीने या चर्चेला पूर्णविराम लागल्याची शक्यता आहे. करणला या सिनेमातून यशाची अपेक्षा असणं सहाजिक आहे. कारण, त्याच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ आणि ‘कलंक’ ने बॉक्स ऑफिसवर चांगलाच मार खाल्ला होता. त्यामुळे त्याला ‘डिअर कॉम्रेड’ कडून अपेक्षा आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive