By  
on  

संजय दत्तच्या 'प्रस्थानम'ला मान्यता मिळेना, यांनी बजावली कायदेशीर नोटीस

संजय दत्त त्याच्या 60व्या वाढदिवसानिमित्त ‘प्रस्थानम’ या सिनेमाचा टीजर रिलीज करण्याच्या विचारात असल्याचं समजलं होतं. पण एका मिडिया पोर्टलला मिळालेल्या माहितीनुसार तेलुगु सिनेमाचा रिमेक असलेला हा सिनेमा अडचणीत आला आहे. मीडिया आणि एंटरटेनमेंट कंपनी शेमारूने संजय दत्त, मान्यता दत्त आणि दिग्दर्शक देवा कट्टाला कॉपीराईट संदर्भात नोटीस पाठवली आहे. या सिनेमाचे हक्क शेमारु कंपनीकडे असल्याचे संजय दत्त यांची टीम परवानगी शिवाय हा सिनेमा बनवू शकत नाही. 

यावर शेमारुचे हेड केतन मारु म्हणतात की, ‘त्यांना अडचणीत आणण्याचा आमचा कोणताही इरादा नाही. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. आमच्याकडे या सिनेमाचे कायदेशीर हक्क आहेत.’ आता यावर संजय दत्तची टीम काय अ‍ॅक्शन घेते हे लवकरच कळेल. या सिनेमात संजय दत्त, मनीषा कोइराला, जैकी श्रॉफ, चंकी पांडे, अली फजल, अमायरा दस्तूर आणि सत्यजीत दुबे यांच्या भूमिका आहेत. हा सिनेमा 20 सप्टेंबर 2019 ला रिलीज होईल अशी शक्यता आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive