By  
on  

करीना कपूरला फिल्मी करीअरमध्ये साकारायचा आहे डबल रोल

अभिनेत्री करीना कपूरने आजवर अनेक भूमिका साकारल्या आहेत. त्या भूमिकामुळे अनेकदा तिच्यावर कौतुकाचा वर्षावही झाला आहे. आता करीना डान्स रिअ‍ॅलिटी शोची जजदेखील बनली आहे. या सेटवर अलीकडेच तिने मनातली गोष्ट बोलून दाखवली आहे. करीना म्हणते, ‘मी कायमच अशा एका भूमिकेच्या शोधात होते, ज्यात मी डबल रोल करू शकेन.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

 

सीता और गीता, चालबाज सारख्या सिनेमात भूमिका साकारावी अशी मनापासून इच्छा आहे. मी चालबाज कमीत कमी 35 वेळा पाहिला आहे.’ करीना पुढे म्हणते, करिष्माने तिच्या करीअरमध्ये ‘जुडवा’ किंवा ‘साजन चले ससुराल’ सारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण मला कधी कधी आश्चर्य वाटतं की मला अशा प्रकारच्या भूमिका का ऑफर झाल्या नाहीत. पण मी डबल रोल असलेल्या भूमिका साकारायला आतुर आहे. 

 

करीनाने नुकतंच ‘अंग्रेजी मिडियम’ सिनेमाचं शुटिंग पूर्ण केलं आहे. या सिनेमात करीनासोबत इरफान खान अभिनय करत आहे. या शिवाय ती अक्षय कुमारच्या ‘गुडा न्युज’ या सिनेमातही काम करत आहे. या सिनेमात कियारा आडवाणी आणि दिलजीत दोसांज यांच्याही भूमिका आहेत. हा सिनेमा 27 डिसेंबर 2019ला पडद्यावर झळकणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive