By  
on  

रणवीर सिंग या व्यक्तीसाठी बसला चक्क गुडघ्यावर, पाहा व्हिडियो

रणवीर सिंग सध्या लंडनमध्ये ’83: द फिल्म’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान रणवीरचा एक व्हिडियो सोशल मिडियावर खुप व्हायरल होत आहे. या व्हिडियोत त्याला फॅन्सनी चहुबाजूंनी घेरलं आहे. रणवीरच्या मागे ढोलही वाजत आहेत. रणवीर लंडनमधील साउथॉलमध्ये पोहोचला आहे. आता तेथील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. 

 

यावेळी गर्दीला चिअर अप करणारा रणवीर एकदम खाली वाकला. त्याच्यासमोर असलेल्या एका व्हीलचेअर वरील वृद्ध महिलेला त्याने अभिवादन केलं आशिर्वाद घेतले आणि आपल्या हातातील फुलही तिला दिलं. यावेळी महिलेनेही रणवीरच्या गालाला किस करत आशिर्वाद दिला. यावेळी ब्ल्यू कलरच्या सुटमध्ये रणवीर खुपच हॅण्ड्सम दिसत होता. यापूर्वीही रणवीर अनेकदा स्टारडम बाजूला ठेवून गर्दीसोबत दिलखुलास मजा करताना स्पॉट झाला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive