By  
on  

ना उपवास आणि ना डाएट खिलाडी अक्षय कुमारने असं उतरवलं 6 किलो वजन

अक्षय कुमार त्याच्या उत्तम सिनेमांसाठी तर ओळखला जातोच. पण त्याही पेक्षा जास्त तो फिटनेससाठी ओळखला जातो. अलीकडे अक्षयने वजन कमी केल्याचं समोर आलं आहे. पन्नाशीनंतरही स्वत:ला पंचविशीतील तरुणाप्रमाणे फिट ठेवणा-या या अभिनेत्याने यासाठी कोणतंही डाएट किंवा उपवास केलेला नाहीये.

अक्षयने त्याच्या या वेटलॉसचं रहस्य सगळ्यांशी शेअर केलं आहे. अक्षय म्हणतो, ‘मी बच्चन पांडे आणि सूर्यवंशी सिनेमासाठी वजन कमी केलं आहे. मी पाच ते सहा किलो वजन कमी केलं आहे. मी यासाठी कोणतंही डाएट फॉलो केलं नाही. मी केवळ कसरत वाढवली आहे. मी वजन कमी करण्यासाठी कोणताही चौकटीबाहेरचा प्रकार अवलंबत नाही.

अक्षय ‘मिशन मंगल’ या सिनेमातून समोर येत आहे. या सिनेमात अक्षय कुमारसह विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, कृति कुल्हारी, निथ्या मेनन आणि शर्मन जोशी सुद्धा महत्वपूर्ण भूमिकेत झळकत आहेत.जगन शक्ती दिग्दर्शित 'मिशन मंगल' १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive