By  
on  

सिनेमाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम या ‘Desi boys चा swag’ एकदा पाहाच !

अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम यांनी देसी बॉईज या सिनेमात एकत्र काम केलं होतं. बॉलिवूडच्या या दोन हॅण्डसम देसी बॉईजचं सिनेमा प्रमोशनच्या निमित्ताने रियुनियन पाहायला मिळालं. यावेळी दोघांचा मस्तीवाला अंदाज पाहायला मिळाला.

कामाच्या व्यस्ततेमुळे हे दोघं एकमेकांना फारसे भेटत नाहीत पण आताच्या संधीचा त्यांनी उत्तम फायदा घेतला.

अक्षय सध्या मिशन मंगलच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे आणि जॉन बाटला हाऊसच्या. दोन्ही सिनेमे 15 ऑगस्टला रिलीज होत आहे. मागील वर्षीही या दोघांचा सिनेमा एकत्र रिलीज झाला होता.

मागील वर्षी अक्षयचा ‘टॉयलेट: प्रेम कथा आणि जॉनचा सत्यमेव जयतेही एकत्र रिलीज झाला होता. पण अक्षय आणि जॉनला या क्लॅशचा फरक पडत नाही असं त्यांनी अलीकडेच स्पष्ट केलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive