By  
on  

नागराज- अमिताभच्या ‘झुंड’ साठी 2020ची वाट पाहावी लागणार?

बॉलिवूडमध्ये सध्या दिग्दर्शकांना सिनेमे रिलीज करण्यासाठी चुरशीचा सामना करताना दिसून येत आहेत. रिलीज करण्यासाठी मनाजोगी तारीख मिळावी यासाठी प्रत्येकाची धडपड दिसून येत आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ सिनेमाला अशाच चुरशीचा सामना करावा लागत आहे. हा सिनेमा 20 सप्टेंबरला रिलीज होणार होता. पण आता तो पुढील वर्षी म्हणजेच 2020मध्ये रिलीज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

‘झुंड’ हा सिनेमा विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकाच्या आयुष्यावर आधारित आहे. विजय यांनी झोपडपट्टीतील मुलांना प्रशिक्षण देत त्यांची फुटबॉल टीम बनवली. याच विजय बारसे यांच्या आयुष्यावर या सिनेमाचं कथानक बेतलं आहे. विजय बारसे क्रिडा प्रशिक्षकाच्या भूमिकेत बिग बी आपल्यासमोर या सिनेमाद्वारे प्रेक्षकांसमोर येतील. नागराजचा हा पहिलाच हिंदी सिनेमा आहे. या सिनेमाचं पोस्ट प्रॉड्क्शन अजून बाकी असल्याने या सिनेमाला उशीर होणार असल्याचही समजलं आहे. आता 2020च्या सुरुवातीला हा सिनेमा रिलीज होईल अशी अपेक्षा आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive