पंतप्रधानांना ‘Man vs Wild’मध्ये पाहण्यासाठी अत्यंत उत्सुक : अक्षय कुमार

By  
on  

राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता अ‍क्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेअर ग्रील्स यांना एकत्र पाहण्यास उत्सुक असल्याचं सांगितलं आहे. अक्षय त्याच्या ट्वीटमध्ये म्हणतो, ‘ साहसावर आधारित असलेला हा शो जलवायु परिवर्तन आणि पृथ्वीवरील वातावरण संवर्धन आणि संरक्षण यांसारख्या बाबींवरदेखील प्रकाश टाकत आहे. आज रात्री माननीय पंतप्रधान नरेंद मोदी मोदी ‘मैन Vs वाइल्ड' में बेयर ग्रिल्ससोबत दिसतील.’ 

दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी देखील या एपिसोडबद्दल सोमवारी ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, ‘पर्यावरण संरक्षण आणि हवामान बदलावर प्रकाश टाकण्यासाठी भारतासारख्या हिरव्यागार देशासारखी दुसरं ठिकाण काय असू शकेल?’

मोदींच्या ट्वीटवर करण जोहरने देखील रिप्लाय केला आहे. तो म्हणतो, ‘ आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक उत्तम संदेश. आपल्याला सगळ्यांना यात योगदान देणं गरजेचं आहे.’ 
‘Man vs wild’ हा शो पर्यावरणविषयी जागरुकता निर्माण करण्याचं काम करत आहेत.

Recommended

Loading...
Share