By  
on  

जान्हवी कपूरने आई श्रीदेवीच्या वाढदिवसानिमित्त अशा दिल्या शुभेच्छा

बॉलिवूडची चांदनी मागच्या वर्षी अकस्मात निखळली आणि सेलिब्रिटींची संपूर्ण चंदेरी दुनिया हळहळली. बॉलिवूडची पहिली सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी यांचा दुबई येथे 2018 रोजी अकस्मात मृत्यू झाला. त्यांनी आपल्या कुटुंबियांना व सर्व चाहत्यांना 'सदमा' देऊन या जीवनाच्या पडद्यावरुन अचानक एक्झिट घेतली.. आज श्रीदेवी यांचा 13 ऑगस्ट हा वाढदिवस. त्यांची आठवण येत नाही असा त्यांच्या चाहत्यांसाठी व कुटुंबियांसाठी-मित्रपरिवारासाठी एकही दिवस नाही. म्हणून आईच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी श्रीदेवी यांची मुलगी आणि अभिनेत्री जान्हवी कपूर हिने् आपल्या इंस्टाग्राम हॅंण्डलवरुन एक गोड पोस्ट शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

जान्हवीने आपल्या आईचा म्हणजेच श्रीदेवी यांचा एका सिनेमातला साधासा पण गोड फोटो शेअर करत, 'हॅप्पी बर्थ डे मम्मा, आय लव्ह यू' असं कॅप्शन दिलं आहे. या पोस्टवरुन हा अंदाज नक्कीच बांंधता येईल की,जान्हवी आईला किती मिस करतेय. जान्हवीला बॉलिवूडमध्ये येण्यासाठी अभिनयाचं बाळकडू आईकडूनच मिळालं. त्या तिच्या कामाकडे सतत बारकाईनं लक्ष द्यायच्या. जान्हवीचा पहिला सिनेमा 'धडक'साठी त्या फार उत्सुक होत्या. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy birthday Mumma, I love you

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive