'तानाजी: द अनसंग वॉरियर' नंतर अजय-काजोल झळकणार आणखी एका सिनेमात

By  
on  

अजय देवगण आणि काजोल हे बॉलीवूडमधलं एक नेहमी चर्चेत असलेलं कपल. खऱ्या आयुष्यातलं हे प्रेमळ जोडपं सध्या ओम राऊत दिग्दर्शित  'तानाजी: द अनसंग वॉरियर'  या सिनेमात एकत्र झळकणार आहेत. तसेच एका आघाडीच्या वृत्तपत्राला मिळालेल्या माहितीनुसार या सिनेमाव्यतिरिक्त हे दोघे एका हलक्या फुलक्या रोमँटिक कॉमेडी सिनेमात सुद्धा एकत्र पाहायला मिळणार आहेत. 

या सिनेमाला अजय आपल्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत या सिनेमाची निर्मिती करत आहे. 'रोमांस और क्या', 'धोका अराउंड द कॉर्नर', आणि 'धोका' ही तीन नावं या आगामी सिनेमासाठी रजिस्टर केली आहेत. तसेच या रोमँटिक कॉमेडी सिनेमाला अजय दिग्दर्शित सुद्धा करणार आहे. पटकथेचं काम झालं की पुढच्या वर्षी या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होण्याची शक्यता आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Standing together for something good ... #plasticbanegafantastic #startalittlegood #beingresponsible

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn) on

सध्या अजय देवगण आपल्या आगामी 'तानाजी: द अनसंग वॉरियर' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात अजय देवगण सह काजोल, सैफ अली खान, पंकज त्रिपाठी आणि ऐश्वर्या राय बच्चन महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. हा ऐतिहासिक सिनेमा १० जानेवारी २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

 

 

Recommended

Loading...
Share