By  
on  

दीपिका म्हणते, 'माझी आणि रणवीरची पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ वेगळी'

दीपिका आणि रणवीर पुन्हा एकदा ‘83’ नंतर स्क्रीन शेअर करत आहेत. रणवीर या सिनेमात कपिल देव यांच्या व्यक्तिरेखेत आहे तर दीपिका रोमी देव यांच्या भूमिकेत आहे. या केमिस्ट्रीबद्दल दीपिकाने नुकताच खुलासा केला आहे. या मुलाखतीमध्ये दीपिका म्हणते की ‘रणवीर आणि मी कलाकार म्हणून एकत्र येतो त्यावेळी वैयक्तिक केमिस्ट्री अजिबात नसते.'

’ दीपिका म्हणते की, तुम्ही सिनेमात अभिनय करत असताना वैयक्तिक नातेसंबंधांबाबत जवळपास विसरूनच गेलो असतो. त्यामुळे या सिनेमातील भूमिकांवरही आमच्या वैयक्तिक केमिस्ट्रीचा फारसा परिणाम झालेला नाही.’ आता दीपिका यात रोमी देव यांच्यासारखा लूक करते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कबीर खान दिग्दर्शित हा सिनेमा 10 एप्रिल 2020मध्ये रिलीज होणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive