राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विकी कौशल म्हणतो, आनंद गगनात मावेना !

By  
on  

राष्ट्रीय सिनेमांची घोषणा हा प्रत्येक कलाकारासाठी महत्त्वाचा क्षण असतो. यावेळी हिंदीसोबतच इतर भारतीय भाषांमधील सिनेमांसाठीच्या पुरस्काराचीही घोषणा केली जाते. यावेळीही हे पुरस्कार घोषित झाले आहेत.
यावर्षी विकी कौशलला ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

 

एका लिडींग डेलीशी बोलताना विकी कौशल म्हणतो, ‘नशीब नावाची गोष्ट अस्तित्वात असते असं ऐकलं होतं. पण कठोर परिश्रमाशिवाय काहीही साध्य होत नाही हे देखील खरं आहे. मागच्या काही दिवसांपासून माझे आई-वडिल विचारत आहेत, तुला कसं वाटतं? खरं सांगू, माझा आनंद गगनात मावत नाहीये.’ 

 

 

यासोबतच आयुष्मान खुराणाच्या कौतुकात तो म्हणतो की, ‘मला त्याच्या सिनेमानिवडीची शैली आवडते. याशिवाय तो एक उत्तम माणूसही आहे.’ यावेळी मल्याळम कलाकार मामुटी यांच्या प्रशंसकांनी ज्युरींच्या निवडीवर शंका उपस्थित केली. यावर विकी म्हणतो, ज्युरी अनुभवी असतात आणि त्यांना त्यांचं काम उत्तम प्रकारे येत असतं. मी माझ्या कामाशी कायमच प्रामाणिक राहिलो आहे. ‘

Recommended

Loading...
Share