या सिनेमाचा अ‍ॅक्शन सीन पाहून जॉनच्या आईला वाटलं त्यावर खरंच हल्ला झाला

By  
on  

जॉन अब्राहम त्याच्या आगामी बाटला हाऊसच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. त्यासाठी तो अलीकडेच ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये येऊन गेला. त्याच्यासोबत मृणाल ठाकूर आणि रविकिशन देखील होते. यावेळी जॉनने ‘टॅक्सी नं 9211’ या सिनेमातील आठवण शेअर केली.

 

या सिनेमातील एका अ‍ॅक्शन सीनवेळी त्याची आई त्याच रस्त्यावरून जात होती. यावेळी जॉन रस्त्यावर आडवा पडला आहे आणि त्यांच्या अंगावर गाडी येते असा सीन होता. त्याच्या आईने हे पाहिलं आणि गुजराती भाषेत अरे मारो डिकरो, मारो डिकरो' असं ओरडत त्याच्याकडे आली. या किस्स्याने त्यावेळी कपिलच्या शोमध्ये प्रत्येकाचं मनोरंजन झालं. जॉनच्या ‘बाटला हाऊस’चं दिग्दर्शन निखिल अडवाणीने केलं आहे. या सिनेमाचा आणि अक्षय कुमारचा सिनेमा एकाच दिवशी म्हणजेच 15 ऑगस्टला रिलीज होत आहे.

Recommended

Loading...
Share