By  
on  

अबब ! 100 कोटींच्या बजेटमध्ये तयार झाला नेटफ्लिक्सचा 'सेक्रेड गेम्स 2'

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सैफ अली खान स्टारर 'सेक्रेड गेम्स'च्या दुस-या सीझनची प्रेक्षक आता चातकासारकी वाट पाहत आहेत. ऑनलाईन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म  नेटफ्लिक्सची पहिली भारतीय वेबसिरीज 'सेक्रेड गेम्स'चा हा दुसरा सीझन उद्या 15 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. पहिल्या सीझनच्या जबरदस्त आणि तुफान लोकप्रियतेनंतर नेटफ्लिक्सने ह्या दुस-या सीझनसाठी तब्बल 100 कोटी रुपये खर्च केले आहेत. आजवर कोणत्याही स्ट्रीमींग सर्व्हिसने भारतात ओरिजनल कंटेटसाठी इतकी रक्कम गुंतवली नसेल तितकी नेटफ्लिक्सने गुंतवली आहे. 

बॉलिवूड जाणकारांनुसार आत्तापर्यंत कोणत्याही वेबसिरीजसाठी प्रति एपिसोड 3-4 कोटी रुपये खर्च करण्यात येत असत. मिडीया रिपोर्टनुसार, 'सेक्रेड गेम्स 2' नेटफ्लिक्सचा सर्वात मोठा महागडा शो आहे. सीझन 1 च्या अफाट यशानंतर प्रेक्षकांच्या भेटीला सीझन 2 घेऊन येण्यापूर्वी तो भरपूर मनोरंजन बनवण्यावर भर देण्यात आला आहे. प्रेक्षकांना एका आगळ्या वेगळ्या मनोरंजनाची अनुभूती मिळावी हा त्यांचा सतत प्रयत्न होता.     

'सेक्रेड गेम्स 2' च्या  400 मिनिटांच्या फुटेजसाठी 3500 लोकांच्या क्रू मेंबर्सनी 100 पेक्षाही अधिक दिवस जवळपास 113 लोकेशन्सवर शूट केलं आहे. ह्यात दिल्ली, मुंबई, नेरौबी आणिकेप टाऊनचा समावेश आहे. 400 मिनीटांचं फुटेज हे जवळपास साडेतीन हिंदी सिनेमांच्या जवळपास आहे. 

 

लेखक विक्रम चंद्रा यांच्या कादंबरीवर सेक्रेड गेम्स ची कथा बेतली आहे. सैफ अली खान, नवाजुद्दीन सिध्दीकी आणि पंकज त्रिपाठी यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत.अनुराग कश्यप आणि नीरज घायवान यांनी या वेबसिरीजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.  

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive