By  
on  

SACRED GAMES 2 REVIEW: नवाजुद्दीन, सैफ आणि पंकज त्रिपाठी यांच्या अभिनयाने सजला आहे सेक्रेड गेम्सचा सीझन 2

वेब शो : सेक्रेड गेम्स 2
कास्ट : सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि पंकज त्रिपाठी
दिग्दर्शक : अनुराग कश्यप आणि नीरज  घयावन
रेटिंग्स : 4 मून्स 

Most awaited webseries असं जिच्याबाबत म्हणता येईल ती म्हणजे ‘सेक्रेड गेम्स’. या सीझनच्या पहिल्या भागाने प्रत्येकालाच फॅन बनवलं होतं. पण पहिल्या सीझनने प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्नही उभे केले होते. पण आता हा सीझन प्रेक्षकांच्या शंका निरसन करतो कि वाढवतो हे लवकरच समजेल. 

कथानक:

जिथे पहिला सिझन संपतो तिथुनच दुस-या सीजनची सुरुवात होते. 13 व्या दिवसापासुन या सीझनची सुरुवात होते. एका विशाल समुद्राच्या मध्यभागी एका होडीला बांधलेला गणेश गायतोंडे(नवाझुद्दीन सिद्दीकी) दिसुन येतो. तो आपली सुटका करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. अखेर त्रिवेदी त्याला वाचवतो. दुस-या बाजुला सरताज सिंगचा(सैफ अली खान) आपल्या व्ययक्तिक आयुष्याच्या समस्यांशी झगडा सुरु आहे. आपली पुर्वपत्नी मेघा त्याला आपल्या आयुष्यात पुन्हा हवी असते. परंतु मेघा लवकरच दुसरं लग्न करणार असते. तर इथे गणेश गायतोंडेही जोजोच्या प्रेमात पडला आहे. त्यानंतर गोष्टी अशा बदलतात की व्ययक्तीक आयुष्यातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी दोघांचेही संबंध गुरुजीशी(पंकज त्रिपाठी) येतात. त्यानंतर अनेक नाट्यमय घटना घडतात आणि प्रेम, संघर्ष, थरारकता अशा अनेक गोष्टींनी युक्त असलेली 'सेक्रेड गेम्स 2' आपल्यासमोर घडत जाते आणि आपण थक्क होऊन पाहत राहतो. पहिल्या सीझनमधल्या काही अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं या सीझनमध्ये मिळतात आणि एक नवा प्रश्न ही सीरीज उपस्थित करते. ते नेमकं काय? हे जाणण्यासाठी तुम्हाला 'सेक्रेड गेम्स 2' पाहावी लागेल.

दिग्दर्शन : अनुराग कश्यप आणि नीरज  घयावन यांनी हा सीझन अधिक उत्कंठापूर्ण बनवला आहे. जिथं पहिला सीझन तुम्हाला प्रश्नांच्या घे-यात टाकतो तर दुसरा सीझन हा शो अधिक पाहावासा वाटेल. अनुराग-नीरज च्या दिग्दर्शनाचं हे यश आहे. 

अभिनय : कलाकारांचा दर्जेदार अभिनय ही या सिरीजची जमेची बाब आहे. नवाजुद्दीने रंगवलेला शिवराळ गणेश गायतोंडे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतो. कल्की कोचलीन, रणवीर शौरी आणि सुरवीन चावला यांनी देखील उत्तम अभिनय साकारला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive