By  
on  

ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांच प्रदीर्घ आजाराने निधन झालं. त्या 72 वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वीच प्रकृती अस्वास्थ्यामुळे हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केलं होतं. त्याचवेळी यांची प्रकृती चिंताजनक होती.

त्यांना हृदय आणि फुफ्फुसाचा त्रास होता. उपचार सुरु केल्यानंतर त्यांची प्रकृती काही काळ स्थिर होती. त्यांना सतत होत असलेल्या हृदयाच्या त्रासामुळे डॉक्टरांनी त्यांना अ‍ॅंजिओप्लॅस्टीचा सल्ला दिला होता. पण त्यांचं वय पाहता कुटुंबियांनी ही शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला. मुख्य प्रवाहापेक्षा वेगळे सिनेमे करण्याकडे त्यांचा कल होता.

छोटी सी बात', 'रजनीगंधा', 'पती, पत्नी और वो' या सुपरहिट चित्रपटात त्यांनी काम केलंय. काव्यांजली, कुल्फी कुमार बाजेवाला या टी.व्ही मालिकांमध्येही त्या झळकल्या आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive