By  
on  

पाहा Video: 'शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळाली लढण्याची ताकद' महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी अक्षय कुमारचा संदेश

सांगली कोल्हापूर भागात अतिवृष्टी आणि पुराने थैमान घातले. तेथील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. परंतु तरीही खचलेली मनं आणि उध्वस्त घरांमुळे तेथील नागरिकांची उमेद हरवली आहे. आजवर देशाच्या विविध भागांमधून पूरग्रस्तांसाठी मदत रवाना झाली आहे. यामध्ये मराठी कलाकारांनी सुद्धा पुढाकार घेत पूरग्रस्तांसाठी मदत केली आहे. 

बॉलीवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारने सुद्धा सोशल मीडियाद्वारे एका व्हिडिओतून पूरग्रस्तांना प्रेरणा दिली आहे. अक्षय म्हणतो,''कोल्हापूर आणि सांगलीमध्ये मुसळधार पावसामुळे खूप नुकसान झालं आहे. तुम्ही सर्वांनी धीर धरा असं मी आवाहन करतो. लढणं आणि पुढे जाण्याची शिकवण आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांकडून घेतली आहे. सांगली-कोल्हापूर येथील आपत्ती व्यवस्थापनाचे तुमची मदत करण्यासाठी तत्पर आहे. मला खात्री आहे ते मिळून तुमचं गाव, तुमचा जिल्हा, तुमचं शहर आधीपेक्षा सुंदर करतील''

सांगली-कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी मराठी कलाकारांनी पुढाकार घेतला असता बॉलीवूड गप्प का? असा उद्विग्न सवाल नागरिकांनी विचारला होता. परंतु खिलाडी अक्षय कुमारने संवेदनशीलता दाखवत पुरग्रस्तांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. मराठी मनोरंजन सृष्टीने केलेली मदत आज पुरग्रस्तांकडे रवाना झाली आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive