रणवीर-दीपिकाच्या संसारात येणार का नवा पाहुणा?

By  
on  

बॉलीवूडमधलं कायम चर्चेत असलेलं कपल म्हणजे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांबद्दल प्रेम दर्शवत असतात. त्यांचं हे परस्परांमधलं प्रेम बघून त्यांचे फॅन्स नेहमीच 'वॉव' म्हणत असतात. अशीच काहीशी वेगळी आणि हटके गोष्ट या दोघांच्या बाबतीत घडली. 

रणवीरने नुकतंच इंस्टाग्रामवर लाईव्ह चॅट केलं. रणवीरच्या हजारो फॅन्सनी रणवीरच्या या चॅटवर कमेंट केली. दीपिकाने सुद्धा यावर कमेंट केली. परंतु दीपिकाने केलेली कमेंट वाचून सगळेच आश्चर्यचकित झाले. दीपिकाने रणवीरला 'हाय डॅडी!' अशी हाक मारली. दीपिकाने 'हाय डॅडी!' म्हणताना छोट्या बाळाचं ईमोजी वापरलं. त्यावरून दीपिका गरोदर असण्याच्या चर्चांना उधाण आले.

दीपिका-रणवीर लवकरच '83' या सिनेमातून एकत्र येणार आहेत. या सिनेमात भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेत दीपिका झळकणार आहे. रणवीर-दीपिकाचं लग्न गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालं. 

Recommended

Loading...
Share