'मिशन मंगल'ची बॉक्स ऑफीसवर यशस्वी भरारी, शंभर कोटींच्या क्लबमध्ये लवकरच दाखल

By  
on  

15 ऑगस्टला येत्या स्वातंत्र्यदिनी प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अक्षय कुमार आणि विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, शर्मन जोशी अशी मल्टिस्टारर स्टारकास्ट असलेल्या 'मिशन मंगल' सिनेमाने बॉक्स ऑफीसवर अवघ्या २ दिवसांत कोटीच्या कोटी उड्डाणे आहेत.'मिशन मंगल'ने पहिल्याच दिवशी तब्बल  29.16 कोटींची कमाई केली. हा सिनेमा अक्षय कुमारच्या करियरच्या सिनेमाचा पहिल्याच दिवसाचा सर्वात मोठा ओपनिंग करणारा सिनेमा ठरला. तर दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 17.28 कोटींची कमाई केली. त्यामुळे या सिनेमाची दोन दिवसांतील कमाई 46.44 कोटी झाली आहे.   

'मिशन मंगल' हा सिनेमा भारताच्या मंगळ मोहिमेची विजयगाथा सांगणारा चित्रपट आहे. अक्षयने यात राकेश धवनची व्यक्तिरेखा साकारली आहे. तर सिनेमातल्या महिला शक्तीनेसुध्दा आपल्या दमदार अदाकारीने प्रेक्षकांची मनं जिंकली. अक्षय कुमार अभिनीत या सिनेमाचं सर्वत्र खुप कौतुक होत आहे. 

 

24 सप्टेंबर 2014 मध्ये भारताच्या शास्त्रज्ञांनी मंगळावर ‘मंगळयान 1’ पाठविले होते.  मंगळयान बनवणं हे भारतापुढील मोठे आव्हान होते. कारण हे यान घडवण्यासाठी लागणारा खर्च हा भारताला परवडण्यासारखा नव्हता. परंतु राकेश धवन आणि त्यांच्या सहका-यांनी हे आव्हान पेलत अतिशय कमी खर्चात ही मोहिम सर केली होती. पहिल्याच प्रयत्नात आणि अतिशय कमी खर्चात ही मोहिम यशस्वीरित्या पार पाडणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. हीच कथा ‘मिशन मंगल’  या  सिनेमात रेखाटण्यात आली आहे. महिला वैज्ञानिकांच्या जिद्दीचंसुध्दा यात दर्शन घडलं.

Recommended

Loading...
Share