‘मिशन मंगल’ चं यश अक्षय आणि विद्याने या अंदाजात केलं साजरं

By  
on  

या स्वातंतत्र्यदिनाला रिलीज झालेल्या ‘मिशन मंगल’ ला चांगली ओपनिंग मिळाली आहे. बॉलिवूडची पहिली स्पेस फिल्म असं या सिनेमबाबत म्हणता येईल. या सिनेमात विद्या आणि अक्षय प्रमुख भूमिकेत आहेत.

 

या सिनेमाला चांगली ओपनिंग मिळाली आहे. या सिनेमाचं यश साजरं करण्यासाठी विद्याने नुकताच एक व्हिडियो शेअर केला आहे. या व्हिडियोत अक्षय आणि विद्या एकमेकांच्या हातात हात घालून मजेने फिरताना दिसत आहेत. या व्हिडियोच्या कॅप्शनमध्ये विद्याने मिशन मंगलच्या यशानिमित्त आनंद व्यक्त केला आहे.

मल्टीस्टारर 'मिशन मंगल'भारताच्या मंगळमोहिमेवर आधारित आहे. या सिनेमात अक्षय कुमार, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, निथ्या मेनन, कीर्ति कुल्हारी आणि शर्मन जोशी प्रमुख भूमिकेत आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन जगन शक्ती यांनी केलं आहे.

Recommended

Loading...
Share