Photo: 'सैरा नरसिंहा रेड्डी' सिनेमातला अमिताभ बच्चन यांचा उलगडला फर्स्ट लूक

By  
on  

'सैरा नरसिंहा रेड्डी'  या दाक्षिणात्य सिनेमातील महानायक अमिताभ बच्चन यांचं पहिलं पोस्टर नुकतंच उलगडलं आहे. गोसाई वेंकन्ना च्या रुपात बिग बी खुपच हटके दिसतायत. अमिताभ बच्चन यांच्यासोबत चिरंजीवी, तमन्ना भाटीया, विजय सेतुपती, किच्छा सुदीप , नयनथारा , रवी किशन आदी कलाकारसुध्दा या सिनेमात झळकणार आहेत. 

निर्माते एक्सेल एंटरटेन्मेटने 'सै रा नरसिंहा रेड्डी'चं हे पोस्टर सोशल मिडीयावर पोस्ट करत एक जबरदस्त कॅप्शन दिलं आहे. " नरसिंहा रेड्डीच्या स्वातंत्र्य युध्दामागचं बळ आणि मार्गदर्शक गुरू , . गोसाई वेंकन्ना'' #WarriorsOfyyeRaa" .  कपाळावर मोटा विजय तिलक, मोठे मोकळे सफेद केस आणि शुभ्र पांढरी दाढी असा बिब बींचा हा लूक खुपच हटके आहे. 

'सैरा नरसिंहा रेड्डी' सिनेमात अभिनेता चिरंजीवी आंध्रचे स्वातंत्र्य सेनानी उयालवाड़ा नरसिंहा रेड्डी्चाय भूमिकेत आहे. तर त्यांच्या आद्यात्मिक गुरुच्या भूमिकेत बिग बी पाहायला मिळतील. ही स्वातंत्र्याची कथा असून हा एक पिरीयड ड्रामा असलेला सिनेमा आहे. बिग बींना ह्या सिनेमात पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

 

Recommended

Loading...
Share