भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ पुन्हा एकदा पडद्यावर, अजय देवगण दिसणार स्पोर्ट्स सिनेमात

By  
on  

अगदी नुकतीच अजय देवगणने नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. अजयने त्याच्या ‘मैदान’ सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. याशिवाय तो आजपासूनच या सिनेमाचं शुटिंग सुरु केल्याचं सांगितलं आहे. 
हा सिनेमा झी स्टुडियो आणि बोनी कपूर यांची सहनिर्मिती आहे. अमित रविंद्रनाथ शर्मा या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत.

 

बोनी कपूर, आकाश चावला और अरुणा जॉय सेनगुप्ता  हे या सिनेमाचे निर्माते आहेत. मैदान हा सिनेमा फुटबॉलच्या सुवर्णयुगाच्या काळावर बेतलेला आहे. या सिनेमबद्दल दिग्दर्शक अमित म्हणतात, स्पोर्ट्स सिनेमा बनवणं ही माझी फार पुर्वीपासूनची इच्छा होती. अजयही या सिनेमात रहीम साब यांची व्यक्तिरेखा साकारण्यास उत्सुक आहे. अजय यावर्षी आणखी एका बायोपिकमध्ये झळाकणार आहे. त्याशिवाय त्याच्या तानजी : द अनसंग वॉरिअरचीही प्रेक्षकांना प्रतिक्षा आहे.

Recommended

Loading...
Share