'त्या' व्हिडिओसंदर्भात करण जोहरने केला खुलासा, म्हणाला...

By  
on  

बॉलीवूडमधील लोकप्रिय फिल्ममेकर करण जोहर नेहमीच कुठल्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेमध्ये असतो. काही दिवसांपूर्वी करणने एक व्हिडिओ स्वतःच्या सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये करण जोहरच्या घरी बॉलीवूडमधले आघाडीचे कलाकार पार्टी करताना दिसत आहेत. 

या व्हिडिओवर दिल्ली येथील राजौरी गार्डन भागातील शिरोमणि अकाली दल चे नेते मनजिंदर सिंह सिरसा यांनी जाहीर टीका केली. ते म्हणाले,''हे आहेत बॉलीवूडमधील मद्यधुंद कलाकार. बॉलीवूडमधील हि मोठी माणसं नशेत स्वतःला हरवून बसली आहेत. मी त्यांच्या ड्रग आणि मद्यसेवनाविरुद्ध आवाज उठवतो''

एका मुलाखतीत करण जोहर या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली. तसेच या मुलाखतीत करणने मनजिंदर सिंह सिरसा द्वारे केलेल्या आरोपांना उत्तर दिले. त्या पार्टी संदर्भात करण म्हणाला,''त्या पार्टीमध्ये बॉलीवूडमधले अनेक कलाकार खूप काम केल्यानंतर थोडं रिलॅक्स होण्यासाठी माझ्या घरी आले होते. मी तो व्हिडियो अगदी गांभीर्याने शूट केला होता. त्यावेळी त्या पार्टीमध्ये काही अनुचित गोष्ट आम्ही करत असतो तर तो व्हिडिओ शूट करायला मी काही मूर्ख नाही.''

करण या  मुलाखतीत पुढे म्हणाला,''मी इतका वेळ गप्प होतो कारण ते आरोप निराधार होते. कोणत्याही पुराव्याशिवाय केलेल्या आरोपांबद्दल मी काय बोलावं. तसेच ज्यात जी पावडर दाखवण्यात आली आहे त्याचा उगाच गैरसमज करून घेतला आहे. जेव्हा एक फॅमिली एकत्र येते तेव्हा ते फक्त आनंद साजरा करतात. त्यामुळे काही लोकं आम्हाला उगाच वारंवार टार्गेट करता आहेत.''

Recommended

Loading...
Share