अमिताभ बच्चन यांनी केली महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

By  
on  

बाॅलिवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधी अंतर्गत 51 लाख रुपयांचं योगदान दिलं आहे. अमिताभ यांनी याआधी शेतकरी कर्ज निवारणासाठी आणि आसाममधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आर्थिक मदत केली होती. 

अमिताभ बच्चन यांनी केलेल्या या बहुमुल्य योगदानामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटरवर बिग बींचे आभार मानले. मुख्यमंत्र्यांनी ट्वीट मध्ये लिहीले आहे की,'अमिताभ बच्चन यांनी महाराष्ट्रातील पुरग्रस्तांसाठी 51 लाख रुपयाचं योगदान दिल्याने त्यांचे मी आभार मानतो. त्यांनी दिलेल्या या बहुमुल्य योगदानामुळे सांगली-कोल्हापुर भागात जी माणसं मदत करण्यास इच्छुक आहेत त्यांना निश्चितच प्रेरणा मिळाली आहे.'

 

अमिताभ बच्चन हे 'कौन बनेगा करोडपती' चा आगामी 11 वा सीझन होस्ट करत आहेत. या सीझनसाठी अमिताभसह त्यांचे चाहते आणि प्रेक्षक उत्सुक आहेत. हा सीझन आजपासुन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तसेच अमिताभ बच्चन यांची 'सैरानरसिम्हा रेडी' या दाक्षिणात्य सिनेमात महत्वपुर्ण भुमिका साकारत आहेत.

Recommended

Loading...
Share