By  
on  

हृतिक रोशनला मिळालं ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून लेक्चरसाठी आमंत्रण

‘सुपर 30’च्या यशानंतर हृतिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार आहे. हृतिकची किर्ती आता आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंतही जाऊन पोहोचली आहे. हृतिकला जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठात विद्यार्थ्यांना संबोधित करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. त्याची जगभरातील लोकप्रियता आणि अभिनयातील करकिर्द पाहता त्याला या विद्यापीठाकडून सन्मानाने बोलवणं धाडलं आहे.

हृतिकला आजवर अनेक आंतरराष्ट्रीय पत्रकांकडून ‘Sexiest man alive’ चा किताब मिळालेला आहे. बॉलिवूडमध्येही त्याला ‘ग्रीक गॉड’ म्हणूनच ओळखलं जातं. हृतिकची ‘कहो ना प्यार है’ ते आतापर्यंतच्या कारकिर्दीबाबतची घडामोड ऐकण्याची संधी यानिमित्ताने विद्यार्थांना मिळणार आहे. याशिवाय हृतिकची ‘सुपर 30’साठी जगभरात प्रशंसा होत आहे. या सिनेमात त्याने आनंद कुमार या गणिततज्ञाची भूमिका साकारली आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive