By  
on  

सुपरस्टार प्रभास आणि अनुष्का शेट्टी लॉस एंजलसमध्ये शोधतायत का स्वपनातलं घर, पण ह्यावर प्रभासल म्हणतो...

सुपरस्टार प्रभास त्याचा आगामी बहुप्रतिक्षित सिनेमा 'साहो'मुळे भलताच चर्चेत असतो. या सिनेमाची गाणी व टीजर-ट्रेलरला प्रेक्षकांकडून दिलखुलास दाद मिळतेय. साहो सिनेमात प्रभाससोबत नायिका म्हणून अभिनेत्री श्रध्दा कपूर झळकतेय. दोघंही या सिनेमाच्या प्रोमोशनमध्ये सध्या जबरदस्त बिझी आहेत. सर्वांनाच आता सिनेमाच्या प्रमोशनची उत्सुकता लागून राहिली आहे. 

'साहो'च्या प्रमोशनदरम्यान प्रभासला अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं. सुपरस्टार असल्याने त्याला साहजिकच अनेक प्रश्नांनी भांडवून सोडलं जातं. त्यापैकी एक प्रश्न त्याला नेहमी विचारला जातो तो म्हणजे त्याचं रिलेशनशीप स्टेटस. प्रभास आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टीच्या अफेर्सच्या अनेकदा खमंग चर्चा रंगतात. नुकतमच एका आघाडीच्या वृत्तपत्राच्या मुलाखती दरम्यान प्रभासला विचारण्यात आलं की, तु खरंच अभिनेत्री अनुष्का शेट्टीसह राहण्यासाठी लॉस एंजलसमध्ये एक स्वप्नातलं घर शोधतोय का असा सवाल त्याला करण्यात आला. त्यावर प्रभास म्हणतो, मला माहित नाही लोकांच्या डोक्यात ह्या सर्व गोष्टी कुठून येतात, त्यांना वाटतं माझं अफेअर असावं, त्यांना वाटतं की मला जी मुलगी आवडते तिचं नाव मी त्यांना सांगून टाकावं नाहीतर इतर कोणासोबत ते माझं नाव जोडून टाकतात."

प्रभास पुढे म्हणतो, मी आणि अनुष्का खुप छान मित्र आहोत. आमचं एकमेकांसोबत मस्त जमतं.आम्ही दोघंही एकत्र बसून आमच्या लिंक-अपच्या अफवांवर हसतो. तेव्हा खुपच मजा येते." आता ह्यात किती खरं की किती खोटं हे येणारा काळ सांगेलच. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive