चुलबुलच्या दबंगाईचा अनुभव घेण्यासाठी सज्ज व्हा, यादिवशी होणार सिनेमा रिलीज

By  
on  

सलमानच्या नव्या सिनेमाची घोषणा जरी झाली तरी चाहते त्याला पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक असतात. आताही त्याच्या दबंग 3ची आतुरता शिगेला पोहोचली आहे. सलमाननेही फार न ताणता त्याच्या सिनेमाच्या रिलीज डेट्ची घोषणा केली आहे. 20 डिसेंबर 2019ला चुलबुल पांडे रसिकांच्या भेटीला येत आहे. ‘दबंग 2’ नंतर जवळपास 7 वर्षांनी हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे.

त्यामुळे सलमान यावेळी काहीतरी नक्कीच वेगळं आणेल यात शंका नाही. दबंग फ्रॅंचाईजीमधील दबंग 3 या सिनेमाबाबत पहिल्यांदाच एक गोष्ट घडत आहे. ती म्हणजे हा सिनेमा हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नडमध्येही प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा प्रभुदेवाने दिग्दर्शित केला आहे. या सिनेमातून अभिनेता महेश मांजरेकर यांची मुलगी सई बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे.

Recommended

Loading...
Share