आता आयुष्मान-नुसरतसह रितेश देशमुख थिरकणार ‘ढगाला लागली कळ’ वर

By  
on  

आयुष्मान खुराणा त्याच्या आगामी ‘ड्रीमगर्ल’साठी खुप मेहनत घेताना दिसून येत आहे. या सिनेमातील दोन गाणीही रिलीज झाली आहेत. पण आणखी एक गाणं रसिकांना थिरकवायला येत आहे. दादा कोंडकेवर चित्रित झालेलं ‘ढगाला लागली कळ’ हे गाणं या सिनेमात रिप्राईज केलं जाणार आहे. विशेष म्हणजे या गाण्यात रितेश देशमुखही झळकणार आहे.

 

रितेश या गाण्यच्या शुटिंगसाठी खुप उत्साहित असल्याचंही दिसून आलं. रितेश म्हणतो, ‘दादा कोंडकेंच्या गाण्यावर डान्स करण्याची संधी मिळणं माझ्यासाथी प्रेरणादायी होतं. याशिवाय नुसरत आणि आयुष्मानसोबत काम करण्याचा अनुभवही छान होता. यंगस्टर्सकडून या गाण्याला उत्तम प्रतिसाद मिळेल यात शंका नाही. ड्रीम गर्लचे दिग्दर्शक राज शांडिल्य म्हणतात की, ‘मी रितेशचा चॅट शो यादों की बारात’मध्ये भाग घेतला होता. त्यावेळी त्याच्याशी मैत्री झाली. त्यामुळे या डान्ससाठी मी त्याला विचारलं त्यावेळी तो लगेच तयार झाला.’ ज्योती तांगरी यांनी हे या गाण्याचं मराठी वर्जन गायलं आहे. हा सिनेमा 13 सप्टेंबर 2019 ला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

Loading...
Share