By  
on  

‘लॅक्मे फॅशन वीक 2019’मध्ये गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरसह फरहानचा जलवा

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर सोशल मिडियावर बरेच अ‍ॅक्टीव्ह असतात. विशेषत: विविध ठिकाणचे ट्रीपचे फोटो देखील तो सोशल मिडियावर शेअर करत असतो. अलीकडेच ही जोडी बॅंकॉकमध्ये व्हेकेशनलाही दिसली होती. आता ही जोडी चर्चेत आहे ते रॅम्प वॉकमुळे. पायल सिंघल साठी लॅक्मे फॅशन वीकच्य दुस-या दिवशी या जोडीने रॅम्प वॉक केलं होतं.

 

या वॉकसाठी फरहानचा लूक खास चर्चेत होता. कारण फरहानने शेरवानी आणि स्पोर्ट्स शुजचं कॉम्बो केलं आहे. एकमेकांकडे पाहात स्मितहास्य करणारे शिबानी आणि फरहान तेथील प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत आहेत. फरहान सध्या शोनाली बोसच्या ‘दा स्काय इज पिंक’ सिनेमात दिसणार आहे. यात त्याच्यासोबत प्रियांका चोप्रादेखील आहे. या शिवाय तो ‘तुफान’ सिनेमातूनही समोर येणार आहे. यात त्याच्यासोबत परेश रावल यांची मुख्य भूमिका आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive