सारासाठी काय पण ......बालीमधला कतरिना कैफसोबतच्या इव्हेंटवर कार्तिकने सोडलं पाणी?

By  
on  

सध्या कार्तिक आर्यन आणि सारा अली खानच्या चर्चित प्रेमाच्या बातम्या वा-यासारख्या पसरतायत.दोघांच्याही रिलेशनशीपच्या बातम्या आणि आगामी सिनेमाच्या चर्चा सध्या जोरदार कानी पडतात. तर सारा आणि  कार्तिक या लव्हबर्डसना अनेकदा स्पॉटसुध्दा करण्यात येते. पण दोघांनीसुध्दा अधिकृतरित्या आपल्या नात्याची कबुली दिलेली नाही. त्यामुळे सर्वच जण त्यांच्या नात्याबाबत प्रचंड उत्सुक आहेत. तसंच नकतंच साराच्या वाढदिवसासाठी कार्तिक चक्क बॅंकॉंकला पोहचला होता. 

आता अशातच आणखी एक इंटरेस्टींग खबर या लव्हबर्ड्सबद्दल समजतेय ती म्हणजे, कार्तिक आर्यनला बालीमध्ये बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफसोबत परफॉर्म करण्याची संधी मिळाली होती परंतु कतरिनासाठी त्याने ह्या इव्हेंटवर चक्क पाणी सोडून दिलं आहे. 

एका लीडींग पोर्टलच्या माहितीनुसार, जेव्हा हा इव्हेंट आयोजकांनी बालीमध्ये कतरिना कैफ आणि कार्तिकसोबत आयोजित केला होता, तेव्हा कार्तिक हा भारतातच होता. त्याने सारासोबत डेटवर जाण्यासाठी ह्या इव्हेंटला जाणं नाकारलं असंही या वृत्तात म्हटलं आहे. आता हे अपकमिंग ऑनस्क्रीन व आत्ताचं आफस्क्रीन कपल जर खरंच प्रेमात आकंठ बुडाले आहेत, तर त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या अधिकृत घोषणेबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy Birthday Princess @saraalikhan95 ️ And Eid Mubarak (this time without the mask )

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

Recommended

Loading...
Share