Exclusive: कार्तिक आर्यनच्या ‘भुलभुलैय्या 2’ मध्ये दिसणार नाही अक्षयचा कॅमिओ

By  
on  

अक्षय कुमारने भुलभुलैय्यामध्ये साकारलेली भूमिका आजही अनेकांची लाडकी आहे. पण या सिनेमाच्या सिक्वेलमध्ये मात्र कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत असणार आहे. नक्कीच तुम्हालासुध्दा असंच वाटलं असणार ना की, भुलभुलैया 2 चा अक्षय कुमार जरी भाग नसला तरी तो मात्र पाहुणा कलाकार म्हणून तरी सिनेमात हजेरी लावेल. पण बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार प्रियदर्शन दिग्दर्शित 2007च्या सायकोलॉजिकल कॉमेडी ड्रामा भुलभुलैयाच्या सिक्वेलमध्ये कॅमिओ करणार नाही, अशी माहिती सूत्रांनी  PeepingMoon.com ला दिली आहे. भुलभुलैया 2 चं दिग्दर्शन अनीस बाज्मी करत असून अभिनेता कार्तिक आर्यन सिनेमात प्रमुख भूमिका साकारतोय.

मागच्याच आठवड्यात अक्षय कुमारच्या भुलभुलैया लुक सारखा कार्तिक आर्यनचा हुबेहूब लुक असलेलं ह्या सिनेमाच्या सिक्वेलचं पोस्टर सोशल मिडीयावर लॉंच करण्यात आलं. पण कार्तिकला पाहून नाराज झालेले अक्षयच्या चाहत्यांनी त्याला ट्रोलही केलं. अक्षयसारखा स्वॅग कोणामध्येच नाही आणि या सिक्वलमध्ये कार्तिकला घेणं, हा तर निर्मात्यांचा अगदीच वाईट निर्णय आहे असं अक्षयच्या चाहत्यांच म्हणणं होतं. यावेळी अक्षयसोबत ‘वेलकम’ आणि सिंग इज किंग सारखे सिनेमे केलेल्या अनीस बज्मींना याबद्दल विचारलं असता त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला. पण पीपिंगमूनच्या निश्चित वृत्तामुळे मात्र अक्षयच्या फॅन्सची निराशा होणार हे नक्की.

Recommended

Loading...
Share