By  
on  

केबीसीमध्ये 'अनाथांची माय' सिंधुताई सपकाळ यांची विशेष उपस्थिती, बिग बी झाले नतमस्तक

केबीसी हिंदीच्या नवीन पर्वाला नुकतीच सुरुवात झाली आहे. बाॅलिवुडचे महानायक अमिताभ बच्चन हे याही पर्वाचे सुत्रसंचालक आहेत. आपल्या खुमासदार सुत्रसंचालनाने त्यांनी याही पर्वात प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. 

केबीसीमध्ये आज 'कर्मवीर' विशेष भाग रंगणार आहे. केबीसीच्या 'कर्मवीर' विशेष भागात 'अनाथांची माय' असणा-या सिंधुताई सपकाळ यांनी विशेष उपस्थिती लावली आहे. सिंधुताई आल्या आल्या अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या पायाला स्पर्श करुन आशीर्वाद घेतले. 

 

केबीसीच्या या विशेष भागात अमिताभ बच्चन आणि सिंधुताई यांच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा रंगल्या. सिंधुताई करत असलेल्या महान सामाजिक कार्याबद्दल अमिताभ बच्चन यांनी त्यांचे कौतुक केले आणि समाजाप्रती ॠण व्यक्त केले. 

सिंधुताईंनी आजवर 1200हुन अधिक लहान मुलांना दत्तक घेतले आहे. त्यांना 'अनाथांची माय' तसेच महाराष्ट्राची 'मदर तेरेसा' म्हणुन संबोधले जाते.

Recommended

PeepingMoon Exclusive